दिल्ली : जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हंटले आहे.आम्ही आठवडाभरत कोरोना वरील लस देण्याच्या तयारीत असू भारतातल्या सर्वात वाईट काळाचा कदाचीत आता शेवट होईल असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
आमची पहिली प्राथमिकता लसींची सुरक्षा आणि परिणामकारकता आहे. आम्हाला यावर तडजोड करण्याची इच्छा नाही. मला वैयक्तिकरित्या वाटते की कदाचित जानेवारीच्या काही आठवड्यात आम्ही लसीकरणास सुरुवात करू. असे हर्षवर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.सध्या भारतात एकूण ८ लसीच्या चाचण्या सुरु आहेत. काहींच्या चचं अनीतीप टप्प्यात आहेत तर काहींची सध्या सुरुवात आहे. ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्ड आहे. त्याची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा चालू असून अंतिम टप्प्यात आहे. द भारताच्या ड्रग रेगुलेटर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
रिकव्हरी रेट मध्ये भारत सर्वोत्तम
डॉ . हर्षवर्धन बोलताना म्हणाले कि 'काही महिन्यांपूर्वी देशात कोरोनाची 10 लाख सक्रिय प्रकरणे होती, ती आता जवळपास तीन लाखांवर आहे. संसर्गाची एक कोटी प्रकरणे झाली आहेत. यापैकी 95 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक आहे. मला वाटते की आपण ज्या समस्यांचा सामना केला त्या आता संपण्याच्या मार्गावर आहेत.