Advertisement

पुन्हा गोदापात्रात एसपींच्या पथकाची धाड

प्रजापत्र | Saturday, 07/10/2023
बातमी शेअर करा

बीड-वाळू माफियांच्या मुजोरीपणाला पोलीस अधिक्षक पथकाचे प्रमुख असलेल्या सपोनि गणेश मुंडे यांनी चांगलाच लगाम लावला असल्याचे चित्र आहे.सिंदफना आणि गोदापात्रात गणेश मुंडेंनी सुरु केलेल्या कारवायामुळे वाळू माफियाचे धाबे चांगलेच दणाणले असून आज दुपारीही चकलंबा हद्दीतील गुंतेगावमध्ये वाळू साठ्यावर छापा मारून १ कोटी पाच लाखांचा माल जप्त करण्यात आला.

      पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मुंडे हे पथकाचे काम मोठया जोमाने पुढे नेत आहेत. मागच्या आठवडाभरात गणेश मुंडेंनी वाळू माफियाविरोधात कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळते. सिंदफना आणि गोदापात्रात केलेल्या कारवाईतून दोन ते तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर आज पुन्हा एकदा चकलंबा हद्दीतील गुंत्तेगांव शिवारातील गोदापात्रात पोलिसांनी छापा मारला. यावेळी 500ब्रासवाळूसह पाच टॅक्टर, पाच केन्या, एक टॅक्टर ट्रॉली, एक मोटारसायकल, दोन मोबाईल व एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान या कारवाईत १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

Advertisement

Advertisement