Advertisement

रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

प्रजापत्र | Thursday, 05/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. तर विद्यमान पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे

 

रश्मी शुक्ला यांनी पुणे पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे. पण राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या सर्व आरोपांतून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्लांवर गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पण गेल्याच महिन्यात या 'फोन टॅपिंग' मध्ये शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहे

Advertisement

Advertisement