बिरदवडी (ता. खेड ) येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व . यशवंतराव पवार यांचा तृतीय स्मृतिदिन २ ऑक्टोबर रोजी बा. मा .पवार माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला . यावेळी स्व . यशवंतराव पवार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल मान्यवरांनी मनोगतातून त्यांच्या गत आठवणींना उजाळा दिला .
या प्रसंगी विद्यालयात यशवंत स्मृती सप्ताह घेण्यात आला . त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी , वक्तृत्व ,निबंध , तसेच मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते यशवंत स्मृतिचिन्ह देण्यात आले . स्मृर्तिदिनानिमित्त कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी स्व. यशवंतराव पवार यांचे जीवनकार्य व शैक्षणिक योगदान या विषयावर व्याख्यान दिले . यावेळी मोहरे म्हणाले ,अत्यंत प्रतिकुल परिस्थित बिरदवडी सारख्या खेड्यात शैक्षणिक संकुल उभारून स्व . यशवंतराव पवार यांनी गोरगरीब , शेतकरी कुटुंबातील मुलांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश दिला . विशेषकरून मुलींच्या शिक्षणाची सोय झाली .या कामी त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.देवयानी मॅडम सावलीप्रमाणे मागे राहिल्या. पतीच्या जाण्याने न खचता संस्थेचे उत्तरदायित्व स्वीकारून समर्थपणे व पारदर्शकतेने कारभार सांभाळत असल्याचं कौतुक मोहरे सरांनी मनोगतातून केले.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार , सचिव ईशानदादा पवार , सहसचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.तानाजीभाऊ पवार, बिरदवडी गावचे सरपंच दत्ताशेठ गोतरणे , माजी सरपंच मोहनशेठ पवार , सामाजिक कार्यकर्ते एकनाथशेठ पवार , संस्थेच्या संचालिका कु.ईश्वरी पवार, पालक संघाचे उपाध्यक्ष मुस्तफा शेख ,सदस्य सारिकाताई काळडोके , विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते .
स्मृतिदिनानिमित्ताने शाळेजवळील चौकाला " स्व. यशवंतराव पवार चौक" , असे नाव देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते फलकाचे आनावरण करण्यात आले . यावेळी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला . संस्थेच्या वतीने सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य विजय चव्हाण यांनी केले .मान्यवरांचा परिचय श्री. दादासाहेब ढाकणे सर यांनी केले . सूत्रसंचलन सौ.भामरे मॅडम यांनी केले तर आभार प्रा.निखाडे मॅडम यांनी मानले.