नांदेड - नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील 24 तासांत 24 मृत्यू झाल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. कहर म्हणजे या मृतांत 12 नवजात मुलांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी या प्रकरणी बहुतांश मृत्यू बाह्य रुग्णांचा झाल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आता घटनेचे गांभीर्य पाहून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, नांदेडच्या सरकारी रुग्णालयात गत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 12 जणांचा मृत्यू सर्पदंश व विषबाधेमुळे झाल्याची माहिती आहे. औषधी व मनुष्यबळाचा तुटवडा ही या मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचा दावा केला जात आहे.
बातमी शेअर करा