Advertisement

धारूरमध्ये बसने चिरडले मोटारसायकल स्वारास

प्रजापत्र | Sunday, 01/10/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर - धारुर  शहरालगतच एस.टी. महामंडळाच्या बसने एका मोटारसायकल स्वारास चिरडल्याची घटना दुपारी घडली. यात मोटारसायकल स्वार ठार झाला असून दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंबहून माजलगावकडे जाणाऱ्या बसने (क्र.एमएच १४ बीटी २५३४) धारुरहून मैंदवाडीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरासमोर  धडक दिली. धडक इतकी जबर होती की मोटारसायकल (क्र.एमएच  ४४ जे ९२०७) व दुचाकी चालक थेट बसच्या खाली मधोमध अडकले. यात मोटारसायकल चालक चंद्रभान भगवान मैंद रा. मैंदवाडी ता.धारुर  (अंदाजे वय ५२) जागीच ठार झाला. तर दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बाष्टे पुढील तपास करत आहेत.
 

Advertisement

Advertisement