Advertisement

कुख्यात दोन दरोडेखोर जेरबंद

प्रजापत्र | Saturday, 30/09/2023
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)-अंबाजोगाई आणि धारूर तालुक्यातील दोघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.हे दोन्ही आरोपी कुख्यात असून यातील एकावर तब्बल २० गुन्हे दाखल आहेत तर दुसऱ्यावर दोन गुन्हे दाखल असून स्थानिक गुन्हे शाखेने या दरोडेखोरांना जेरबंद केले. 
       हयात अली बाबुलाल अली सय्यद (इराणी) (वय-३८ रा- इराणी मोहल्ला श्रीरामपुर जि.अहमदनगर),मिस्कीन जावेद जाफरी (वय-२२ रा.इराणी गल्ली परळी) असे अटक केलेल्या दरडेखोरांची नावे आहेत.  हयात अली बाबुलाल अली हा कुख्यात दरोडेखोर असून त्याच्यावर गंभीर स्वरूपांचे २० गुन्हे दाखल आहेत.तसेच त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला असून तो मागच्या अनेक महिन्यांपासून फरार होता.अंबाजोगाई लातूर रोडवर ३० ऑगस्ट २०२३ रोजी श्यामसुंदर श्रीरंगराव मोरे (वय-६५ रा.मोरेवाडी) यांना दोन अज्ञात चोरटयांनी अडवून दोन अंगठया,गळयातील दोन तोळयाचे सोन्याचे लॉकेट असा १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ३१ ऑगस्ट रोजी गुन्ह दाखल करण्यात आला होता.याचा तपास पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे सोपविला होता.दरम्यान या गुन्ह्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री.खटावकर यांना मिळताच सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांनी टोकवाडीत सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.यातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी गुन्यातील दुचाकी ही जप्त केली आहे.दरम्यान या दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता २ सप्टेंबर रोजी धुनकवाडी फाटा धारुर रोडवर येथे गाडी आडवून 'आम्ही सीबीआय पोलीस असल्याची बतावणी करून' दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट व इतर ऐवज असा ९० हजारांचा मुद्देमाल या चोरटयांनी लंपास केल्याची कबुलीही पोलिसांना दिली. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, सलीम शेख,मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे,निलेश ठाकुर,विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड,सचिन आंधळे अश्विनकुमार सुरवसे,अशोक कदम यांनी केली. 

 

या पोलीस ठाण्यात दाखल आहेत गुन्हे 
हयात अली बाबुलाल सय्यद इराणीवर लोणी काळभोर(पुणे शहर) येथील मोक्का गुन्हयात फरार आरोपी आहे.तसेच त्याचेवर  अहमदनगर जिल्हयात पोस्टे कोतवाली (७ ),लोणी(१),तोफखाना(२), श्रीरामपुर शहर(२), पुणे शहर येथील पोस्टे वारजेमाळवाडी(१), भारती  विद्यापिठ(१), वानवाडी(१ ),विश्रामबाग(१), कोथरुड(१), ठाणे शहरातील पो.स्टे.महात्माफुले चौक(१), ठाणे ग्रामीण जिल्हयातील पोस्टे भीवंडी(२) असे एकूण (२०) गुन्हे दाखल आहेत. तर मिस्कीन जावेद जाफरी (रा.परळी) याच्यावर लातुर जिल्हयात पोस्टे गांधी चौक येथे बतावणी करून फसवणुकीचे २ गुन्हे दाखल आहेत.दोन्ही आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

Advertisement

Advertisement