Advertisement

मनोज जरांगे यांचा 30 सप्टेंबरपासून दौरा

प्रजापत्र | Wednesday, 27/09/2023
बातमी शेअर करा

जालना - मराठा समाजाला शांततेचे आवाहन करण्यासाठी 30 सप्टेंबरपासून मराठा समाज संवाद दौरा करणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. हा दौरा 11 ऑक्टोंबरपर्यंत असेल. त्या नंतर 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. मराठा समाजाचे प्रश्न ऐकूण घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीच हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

सरकारने जी 30 दिवसांची‎मुदत मागीतली ती 14 ऑक्टोबर संपत ‎आहे. त्या दिवशी आम्ही आंतरवाली ‎सराटीत मराठ्यांची ताकद दाखवून देऊ. ‎तेथून पुढेही सरकारकडे 10 दिवस‎ असणार आहे. कारण आम्हीच‎ सरकारला आणखी 10 दिवस वाढवून‎ दिले आहे. तरी आरक्षण मिळाले नाही‎ तर 24 ऑक्टोबरला भूमिका जाहीर करु.‎ तोपर्यंत आरक्षण मिळेल ही आशा असल्याचेही ते म्हणाले. ‎ आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे ‎सुरु आहे त्याबाबत सरकारकडून‎ अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. ‎त्यांनी माहिती दिली नाही तरी हरकत‎ नाही. सरकारने 30 दिवसांचा वेळ‎ मागीतला आम्ही 10 दिवस वाढीव दिले. ‎आता आम्हाला 40 दिवसांच्या आत ‎आरक्षण द्या, हीच आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement