Advertisement

भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी

प्रजापत्र | Tuesday, 26/09/2023
बातमी शेअर करा

भारताने घोडेस्वारी प्रकारात तब्बल 41 वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारतीय संघात दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली आहेत. भारताचे हे आजच्या दिवसातील तिसरे पदक आहे.

भारताने इक्वेस्टेरियन (घोडेस्वारी) ड्रेसेज टीमने चीन आणि हाँगकाँग सारख्या तगड्या संघांना मात देत आपले या क्रीडा प्रकारातील पहिले विहिले सुवर्ण पदक जिंकले. संघातील दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांनी एकूण 209.205 गुण मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

एशियन गेम्समधील आजच्या दिवसात भारताचे हे आजचे तिसरे पदक आहे. यापूर्वी नौकानयनमध्ये भारताच्या नेहा ठाकूरने रौप्य इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते.

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताची नौकानयपटू नेहा ठाकूरने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होते. याचबरोबर सेलिंगमध्येच विंड सर्फर स्पर्धेत इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते.

आता घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारताने आतापर्यंत एकूण 14 पदके जिंकली आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 2 सुवर्णांसह 11 पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement