Advertisement

करचुंडीत गांजाच्या शेतीवर छापा,१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रजापत्र | Tuesday, 26/09/2023
बातमी शेअर करा

बीड - नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या करचुंडी गावात एका शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी छापा मारून १६ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सहा.पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना (दि.२५) रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे नेकनुर हाद्दीत १.बाळासाहेब देवराव शिंदे (वय-३५), २. बंकट कल्याण शिंदे (वय-३५), ३.डिगांबर आश्रुबा शिंदे (वय-४५) वर्ष, ४. कुंडलीक निवृत्ती औटे, सर्व रा. करचुंडी ता.केज जि.बीड यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतामध्ये बेकायदेशीररीत्या गांज्याची लागवड करुन त्याचे सवर्धन केले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन त्यानुसार सहा.पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी सदर बातमीची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांना देवुन मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्यासह पथकाने करचुंडी येथे मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण ३३० कि.ग्रॅ. गांजा ज्याची किंमत १६,५४,६००/- ( सोळा लाख चोपन हजार सहाशे ) असा लागवड केलेला मिळुन आल्याने लागवड केलेल्या तिघांना ताब्यात घेत एक फरार आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात पोउपनि पानपाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सदरची कारवाई नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक,बीड व कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधिक्षक पंकज कुमावत,विलास हजारे,सहा.पोलीस निरीक्षक, दोन शासकी पंच, पोउपनि पानपाटील, पोउपनि रोकडे, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोह/ १२०३ डोंगरे, पोह/ २३२ क्षीरसागर, पोह / १५४७ बळवंत, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोना / १५१६ पुंडे, पोअं/२८० शेळके, पोअ /८९३ मुंडे, पोलीस अंमलदार शमीम पाशा, पोअं/४४४ ढाकणे, पोअं/ १८८५ क्षीरसारगर, पोना / ८३७ राख, पोह/ १२४४ राऊत, होमगार्ड धन्वे, शेख, वरभाव, कुलकर्णी, वाघमारे, शेख, घरत, खंदारे केली. 

Advertisement

Advertisement