Advertisement

भारत यूएइ ला 75 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार

प्रजापत्र | Tuesday, 26/09/2023
बातमी शेअर करा

केंद्र सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड मार्फत संयुक्त अरब अमिराती मध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. सरकारनं 75 हजार टन तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयानं एक अधिसूचना जारी केली आहे आणि या संदर्भात माहिती जारी केली आहे.

 

 

तांदळाच्या निर्यातीवर बंदी आल्यानं वाईट परिस्थिती
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारनं सध्या देशात बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये तांदळाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये तर लोकांना बिगर बासमती तांदूळ मिळणंच कठिण झालं होतं. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच, भारताच्या निर्णयानंतर तांदळाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बंदी असतानाही, भारतानं आपल्या मित्रांच्या आणि शेजारी देशांच्या विनंतीनुसार त्यांची अन्न सुरक्षा मागणी पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि काही देशांना बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

यूएइ व्यतिरिक्त 'या' देशांनाही यापूर्वी भारतानं दिलाय दिलासा
NECL मार्फत 75,000 टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ यूएइ ला निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं तेथील तांदळाच्या किमतीतही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याआधी मोदी सरकारनं सेनेगलला 5 लाख टन, गांबियाला 5 लाख टन, इंडोनेशियाला 2 लाख टन, मालीला 1 लाख टन आणि भूतानला 48,804 टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली होती.

 

 

'या' यादीत भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरचाही समावेश
यूएइ व्यतिरिक्त इतरही भारत सरकारनं बंदी असतानाही NCEL द्वारे बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिलेल्या इतर देशांमध्ये शेजारील भूतानचा देखील समावेश आहे. भूतानला 79 हजार टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर मॉरिशसला 14 हजार टन आणि सिंगापूरला 50 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

 

 

यूएइ व्यतिरिक्त 'या' देशांनाही भारताचा दिलासा
NECL मार्फत 75,000 टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ UAE ला निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं तेथील तांदळाच्या किमतीतही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याआधी मोदी सरकारनं सेनेगलला 5 लाख टन, गांबियाला 5 लाख टन, इंडोनेशियाला 2 लाख टन, मालीला 1 लाख टन आणि भूतानला 48,804 टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली होती.

 

 

भारताकडून बिगर बासमती निर्यातीवर बंदी का?
देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारनं 20 जुलै रोजी बिगर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे, ज्यानं 2022-23 मध्ये तांदळाच्या जागतिक निर्यातीत 40 टक्के योगदान दिलं आहे.

2022-23 मध्ये भारताची एकूण बिगर-बासमती पांढर्‍या तांदळाची निर्यात 42 लाख डॉलर होती, तर गेल्या वर्षी ही निर्यात 26.2 लाख डॉलर इतकी होती. भारत मुख्यत्वे अमेरिका, थायलंड, इटली, स्पेन आणि श्रीलंका या देशांना बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करतो.
 

Advertisement

Advertisement