Advertisement

लस आल्यानंतरही मास्क लावणे बंधनकारकच- मुख्यमंत्री

प्रजापत्र | Sunday, 20/12/2020
बातमी शेअर करा

मुंबई : आपल्या सुरक्षेसाठी तोंडाला मास्क लावणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. कोरोनावरील लस आल्या नंतरही आपण गाफील राहून चालणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला  संवाद साधताना म्हंटले आहे. 
           यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि  'भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. यासाठी आपण कमीत कमी इथून पुढचे सहा महिने जर मास्क लावला आणि सामाजिक अंतराचे पालन केले तर पूर्ण नाही पण काही प्रमाणात तरी संसर्ग कमी होईल. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगणे कुटुंबप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

रात्रीच्या संचारबंदी बाबत काय म्हणाले मुख्यमंत्री ? 
 बहुतांशी लोक मला रात्रीची संचार बंदी करा किंवा पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचे सुचवत आहेत पण मला वाटते कि जवळपास ७५ टक्के लोक नियमाचे पालन करत आहेत.असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.पण तरीसुद्धा काही लोक जॆ नियमाचे पालन करत नाहीत त्यांनी  नियमाचे पालन करावे. तरच आपण कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवू शकतो. तसेच परदेशातून येणाऱ्या लोकांच्या टेस्टसुद्धा सध्या थांबवता येऊ शकत नाहीत, आपण हळूहळू पुढे जात आहोत,हे आपल्याला अनुभवातून आलेले शहाणपण आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

Advertisement

Advertisement