बीड-शिरूर कासारमधील एका वेल्डिंगच्या दुकानातून अनेक साहित्य लंपास करणाऱ्या दोन चोरट्यासह उखंड येथील खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांच्या टीमने या कारवाया केल्या आहेत.
वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाईच्या मोहीम अधिक गतिमान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शिरूर कासारमधील पवने या वेल्डिंगच्या दुकानातून ऑईल डब्बे,ट्यूब,गल्फ ऑईलसह अनेक साहित्य अज्ञात चोरटयांनी गेल्या महिन्यात लंपास केले होते.याप्रकरणात १३ ऑगस्ट रोजी गुन्ह दाखल करण्यात आला होता.अखेर या गुन्ह्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
शेख दस्तगीर शामेर (रा.महंमदिया कॉलनी),अमोल बाबुराव भांगे (रा.प्रकाश आंबेडकर नगर) हे दोघे पेठ बीड भागात वेल्डिंगच्या दुकानातील चोरीला गेलेले साहित्य विक्रीसाठी फिरत असताना पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.यावेळी दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीचा माल पोलिसांनी यावेळी हस्तगत केला.याप्रकरणातील एक चोरटा अद्याप फरार असून पोलीस याचा तपास करीत आहेत.
तसेच उखंड येथील जगनाथ विठोबा भोंडवे यांचा शासनाकडून मिळणाऱ्या श्रावण बाळ योजनेचे पैसे बंद केल्याच्या रागातून संतोष नवनाथ कवठेकर व बाळू अर्जुन ठोसर या दोघांनी खून केला होता.यातील फरार संतोष कवठेकर याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे भागवत शेलार यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे व इतर कर्मचाऱ्यांनी नायगावमधील एका हॉटेलमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशिराम जगताप,कैलास ठोंबरे,अशोक दुबाले राहुल दुबाले, नसिर शेख, भागवत शेलार, चालक श्री.दराडे यांनी केली आहे.
बातमी शेअर करा