नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले आहे. नवीन संसद भवनात आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली. केंद्रीय कॅबीनेटमध्ये महिला आरक्षणासाठी विधेयक मंजूर करण्यात आले.
दरम्यान आज हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नवीन संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांसाठी इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. महिला आरक्षणावर बरीच चर्चा झाली. महिला आरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज आपले सरकार संविधान दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळेल. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले, पण अनेक पवित्र कामांसाठी देवाने माझी निवड केली आहे.