Advertisement

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी आक्रमक

प्रजापत्र | Monday, 18/09/2023
बातमी शेअर करा

बीड- राज्यातील सरकार कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. हा प्रकार अन्यायकारक असून कायमस्वरुपी नोकरभरती करण्यात यावी, या मागणीसाठी आज (दि.१८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तीव्र निदर्शने करत शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

भाजप सरकार मनमानी पद्धतीने कारभार करत असून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही अन्यायकारक असून कायमस्वरुपी नोकरभरती करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शासनाच्या जीआरची होळी करत निषेध केला.

Advertisement

Advertisement