Advertisement

तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात

प्रजापत्र | Saturday, 16/09/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - परळी-बीड रस्त्यावरील तळेगाव-पांगरी दरम्यान काल रात्री १०.४५ वा. सुमारास दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. 

     तळेगाव- पांगरी दरम्यान सिरसाळा येथील रमेश त्रिंबक काळे (वय-४४) हे सिरसाळ्याकडे जात असतांना त्यांच्या गाडीला आपघात घडला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिस तात्काळ पोहचले. उत्तरीय तपासणीसाठी मयताचे शव  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement