Advertisement

आय टू आयने सिद्ध केली विश्वासार्हता

प्रजापत्र | Friday, 15/09/2023
बातमी शेअर करा

बीड दि. १५ (प्रतिनिधी ) :व्यवसायात मोठे होण्यासाठी अनेकदा लोक अनेकदा शॉर्ट कट वापरतात, पण विश्वासार्हता हाच कोणत्याही व्यवसायातील यशाचा मार्ग असतो. बीडच्या आय टू आय या चष्म्याच्या क्षेत्रातील शोरुम ने हीच विश्वासार्हता सिद्ध केली आहे. काळ बीड शहरातील अनेक चष्म्याच्या दुकानांवर धाडी पडल्या, त्या होत्या कॉपी माल विकण्यासाठीच्या. अनेक ठिकाणी काही गैरप्रकार आढळले देखील. मात्र तपासणी पथकाने एक तास पडताळणी केल्यानंतरही आय टू आय मध्ये मात्र एकही कॉपी प्रॉडक्ट आढळला नाही.
मागच्या आठ वर्षांपासून बीडमध्ये आय टू आय नावाने चष्म्याचे शो रूम चालविले जाते. या क्षेत्रात असलेली प्रचंड स्पर्धा असतांनाही केवळ गुणवत्ता आणि दर्जाच्या बळावर या शो रूमची वाटचाल सुरु आहे. चष्म्याच्या क्षेत्रात बनवत किंवा कॉपी प्रॉडक्ट विकण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. बीडमध्ये देखील अनेक ठिकाणी हे होते. काल कंपनीच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या धाडीमध्ये ते अनेक दुकानावर स्पष्टही झाले. मात्र आय टू आय मध्ये पथकाने तब्बल एक तास तपासणी केली, त्या ठिकाणी पथकाला एकही कॉपी माल आढळला नाही . दुकानातील रेकॉर्ड आणि इतर गोष्टी पाहून तपासणी पथकाने देखील समाधान व्यक्त केले. या घटनेमुळे आय टू आय ने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. 

 

Advertisement

Advertisement