मुंबई : महाविकास आघाडीची वर्षपूर्ती नुकतीच झाली . त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे खूप नेते पक्षावर नाराज असून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येईल असा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अशातच भाजपाचे कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही काळे यावेळी म्हणाले. त्यामुळे काळे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.
सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू,असे काळे भाषणा दरम्यान म्हणाले होते. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असं कल्याणराव काळे भाषणात म्हणाले.
बातमी शेअर करा