Advertisement

गेवराईत वकील संघाचा तहसीलवर धडक मोर्चा

प्रजापत्र | Monday, 11/09/2023
बातमी शेअर करा

गेवराई - अंतरवली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गेवराई येथील वकील संघाने आज सकाळी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, आंदोलकावर झालेल्या लाठीमार निषेध करण्यात येत आहे. अंतरवली सराटी येथे आंदोलनास बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी वकील संघाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर गेवराई वकील संघाचा जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अमित मुळे, सचिव ऍड. प्रदिप मडके यांची स्वाक्षरी आहे. या आंदोलनात वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते..

Advertisement

Advertisement