मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं त्याचा आजचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र, जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं घेणंही बंद केलं आहे. त्यांनी सलाईनही काढलं आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे.
आज सर्वपक्षीय बैठक
मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा तिढा सोडवायचा कसा यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. ११) सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत कोंडी फुटणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सर्व प्रमुख पक्षांमध्ये मराठा आणि ओबीसी असे दोन गट असल्याने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याने सरकारची 'इकडे आड तिकडे विहीर' अशी स्थिती झाली आहे.
या सर्वपक्षीय बैठकीला कोण-कोणत्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे?
1) अशोक चव्हाण, काँग्रेस
2) अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता (ठाकरे गट)
3) विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता (काँग्रेस)
4) उदयनराजे भोसले, खासदार (भाजप )
5) नाना पटोले, काँग्रेस
6) बाळासाहेब थोरात (काँग्रेस )
7) जयंत पाटील, राष्ट्रवादी
8) राजेश टोपे, राष्ट्रवादी
9) चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
10) जयंत पाटील, शेकाप
11) हितेंद्र ठाकूर,बहुजन विकास आघाडी
12) कपिल पाटील, लोकभारती पक्ष
13) विनय कोरे, जनसुराज्य पक्ष
14) महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष
15) बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्ष
16) राजू पाटील, मनसे
17) रवी राणा, आमदार
18) विनोद निकोले , मार्क्सवादी कम्युनिष्पक्ष
19) संभाजी राजे भोसले, माजी खासदार
20) प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
21) सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना
22) जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष
23) राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
24) मुख्य सचिव
25) प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग