Advertisement

मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण

प्रजापत्र | Friday, 08/09/2023
बातमी शेअर करा

 आष्टी - मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार ठोस भुमीका घेत नसल्याने चोभानिमगावात आज सकाळी आक्रमक आंदोलन करण्यात आले.  यावेळी गावातील २८८ तरूणांनी मुंडण करत सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी केला. तसेच आंदोलकांनी जरांगे यांना पाठिंबा देत गावातील मंदिरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी समाज बांधवांनी उपोषण, इतर आंदोलन सुरू केले आहेत. तरी देखील सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील आंदोलकांनी केला. तसेच आज सकाळी गावातील तब्बल २८८ तरुण आंदोलकांनी मुंडण करत सरकारचा प्रतिकात्मकरित्या दशक्रिया विधी पार पाडत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आंदोलकांनी गावातील मंदिरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Advertisement

Advertisement