महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून 'शेकरु', महाराष्ट्राचा राज्यपक्षी 'हरियाल' बरोबरचं आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट ओळखला जाणार आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवर 'सिल्वर पापलेट' हा मासा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे. सुधीर मुनगंटीवर यांनी पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.
महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून याआधी कोणत्याही माशाच्या प्रजातीला मान्यता मिळाली नव्हती, पण आता 'सिल्वर पापलेट'ला ही मान्यता मिळाली आहे. मुळात यामाशाचं नाव पॉम्फ्रेट असे आहे. मात्र, स्थानिकांकडून या माशाला पापलेट या नावाने ओळखलं जातं.
मत्स व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, "‛सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून यापुढे ओळखला जाईल अशी घोषणा आज मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला."
पापलेट संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी जवळील भागात आढळतो. श्रीमंतवर्ग पापलेट मासा खाण्याला जास्त प्राधान्य देतात. पापलेट मासा महागड्या माशांपैकी एक आहे. कारण तो कमी प्रमाणात सापडतो.