Advertisement

वर्ल्ड कपसाठी काही तासात टीम इंडियाची घोषणा

प्रजापत्र | Monday, 04/09/2023
बातमी शेअर करा

मुंबई - आयसीसी वर्ल्ड कप 2023 ला मोजून एक महिना बाकी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. सामन्याचं आयोजन हे चेन्नईत करण्यात आलं आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याबाबत प्रत्येक भारतीय चाहत्यांना उत्सुकता लागून होती. अखेर ती प्रतिक्षा काही तासातच संपणार आहे.

वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. आयसीसी नियमांनुसार, वर्ल्ड कपसाठी टीममध्ये 15 खेळाडूंचीच निवड करता येणार आहे. आशिया कप 2023 स्पर्धेसाठी एकूण 17 मुख्य आणि 1 राखीव अशा 18 खेळाडूंची निवड करण्यात आली. या 18 जणांमधूनच वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू याकडे क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.

 

वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी?
वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या नावाची निवड झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अजून 2 खेळांडूंवरुन अजून खलबतं सुरु आहे.कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली जसप्रीत बुमराह, ईशान किशन, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा,हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांची नावं जवळपास निश्चित आहेत. इतकंच नाही निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर काही आश्चर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात.

Advertisement

Advertisement