Advertisement

धारुरमध्ये शेतकऱ्यांचा संताप

प्रजापत्र | Monday, 04/09/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत तब्बल चार तास रास्ता रोको केला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा धिक्कार करत तालुक्यात दुष्काळ जाहिर करुन १०० टक्के नुकसान भरपाई व पिक विमा देण्याची मागणी केली.

 

 

धारुर तालुक्यातील धारुर, तेलगाव, मोहिखेड आदी मंडळात पावसाचा ९ दिवसाचा खंड असल्याच्या चुकीच्या अहवालामुळे २५% अग्रीम पासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले. तालुक्यात प्रत्यक्षात महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिकं अक्षरशः करपुन गेली आहेत. यामुळे आज (दि.४) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता सर्वपक्षीय रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील सर्व मंडळाच्या हजारो शेतकऱ्यांनी सहभागी होत प्रशासनाचा निषेध नोंदवला. पावसा अभावि करपलेल्या सोयाबीन सारख्या पिकांची व कृषि कार्यालयाच्या निषेध फलक घेवून शेतकरी सहभागी झाले. यावेळी कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी (दि.५) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुक्याची वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना संपूर्ण मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोकोतून माघार घेतली. यावेळी तहसीलदार कांबळे, सपोनि विजय आटोळे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement