दिल्ली - कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आज पियुष यांची भेट घेऊन त्यांच्याशी कांद्याप्रश्नी चर्चा करत आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढीवरून दिल्लीत बैठक सुरू आहे. अशातच कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
बातमी शेअर करा