पाटोदा :-महाराष्ट्रातील सर्वात मोठया सेवा सोसायटीतील एक असणाऱ्या पाटोद्याच्या सेवा सहकारी सोसायटीमध्ये आ. सुरेश धस यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत रामकृष्ण बांगर आणि बाळा बांगर यांच्या 'शेतकरी विकास'पॅनलचे तेरा ही उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आले आहेत.अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत बांगर यांनी या सोसायटीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व अबाधित ठेवले.
बुधवारी झालेल्या पाटोदा सेवा सोसायटी निवडणुकीत रामकृष्ण बांगर यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या आ.सुरेश धस यांच्या पॅनलला धुळ चालत रामकृष्ण बांगर, बाळा बांगर यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवत
या पॅनल मधील गर्जे हरिदास विठ्ठल , घुमरे सुभाष प्रताप , जाधव सुनील विठ्ठलराव , नागरगोजे राहुल दिनकर , पवळ अश्राजी अण्णा , बामदळे बाबासाहेब बाबुराव , भोसले शहाजी बलभीम , वीर दादासाहेब बारीकराव , जाधव लखपती देविदास , नागरगोजे तारामती बाजीराव, सय्यद सज्जाद इकबाल , मधून गर्जे रामदास नामदेव , अडागळे बाबासाहेब यादव विजयी झाले आहेत.या निवडणुकीसाठी गुलाब घुमरे, दीपक घुमरे, सरपंच आनंद घुमरे, नगरसेवक बाबुराव जाधव, सरपंच नामदेव सानप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.