Advertisement

बीडमध्ये निघाली बालविवाह प्रतिबंध रॅली

प्रजापत्र | Monday, 14/08/2023
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यात बालविवाहाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने चालू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज (दि.१४) रोजी येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण वरून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. प्रचंड उत्साहात सुरू झालेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा परिषदेचे इतर सर्व अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधीवर आज आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीसाठी विविध शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उत्साह दाखवला.
शहरातील महाविद्यालयांमधील एनसीसी चे विद्यार्थी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी गणवेशात उपस्थिती नोंदवली.
छत्रपती संभाजी क्रीडांगणाचे मैदान सकाळपासून या शाळकरी मुलांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते यातून येणाऱ्या काळात जिल्ह्यात बालविवाह होऊच नयेत यासाठी संदेश देण्यात येत आहे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement