तुम्हालाही घरी बसून पैसे कमवण्याची ऑफर आली आहे का? तुम्हालाही सोशल मीडिया पोस्ट लाइक करुन हजारो रुपये कमवण्याच्या मोहाला बळी गेला आहात का? जर तुम्हाला ही ऑफर मिळाली असेल तर सावधान. या मोहापोटी एका व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोशल मीडियामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. घोटाळेबाज आता नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील पुण्यातून समोर आला आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी एका ४३ वर्षीय व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. १०० रुपयांच्या लालसेपोटी एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झालीय.
‘लाइक करो पैसा कमाओ’
गुजरातमधील वडोदरा येथे राहणारे प्रकाश सावंत हे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी सायबर क्राईम पोलिसात लाखो रुपयांची फसवणूक आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे व्यक्ती पुण्यातील हिंजवडी भागातील रहिवासी आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने तक्रारीत म्हटले आहे की, मार्च महिन्यात त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये त्याला घरी बसून पैसे कमवण्याची ऑफर देण्यात आली होती. संदेश देणारी एक महिला होती जिने स्वतःचे नाव दिव्या असे सांगितले होते.
विश्वास संपादन करुन फसवणूक
प्रकाश सावंत यांना सांगण्यात आले की त्यांना एक इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करायची आहे, ज्यासाठी त्यांना प्रति लाईक १०० रुपये मिळतील. प्रकाश यांनी ते मान्य केले. सुरुवातीला त्यांना पैसे दिले जात होते. प्रकाश यांच्याशी ओळख झाल्यानंतर दिव्यानं त्यांना एका गृपध्ये अॅड केलं. तिथे प्रकाश यांची लकी नावाच्या महिलेशी ओळख झाली. लकीच्या वतीने, प्रकाश यांना यूट्यूब चॅनल लाइक आणि सबस्क्राइब करण्याचे काम देण्यात आले, त्या बदल्यात त्यांना ५०० रुपये मिळाले.
मेसेजमधून १२ लाखांचा गंडा
यानंतर प्रकाशला एका योजनेची माहिती देण्यात आली, जिथे प्रकाशला १००० रुपये जमा केल्यानंतर १३०० रुपये आणि १०००० ऐवजी १२३५० रुपये मिळाले. प्रकाश आता दिव्या आणि लकी यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू लागला. दरम्यान काही दिवसांनंतर प्रकाश यांना एक ऑफर देण्यात आली, त्यामध्ये त्यांना ११ लाख २७ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आणि त्या बदल्यात चांगली रक्कम परत करण्याची ऑफर देण्यात आली. प्रकाशने विश्वास ठेवत सहज पैसे ट्रान्सफर केले. मात्र, जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे आणखी पैसे मागितले गेले. समोरुन पैसे देण्यास नकार दिला. खूप प्रयत्न करूनही प्रकाशला पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेवटी तक्रार दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.