बीड - शहरात अनाधिकृत पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तीन जणांना आज (दि.९) रोजी जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन पिस्टल जप्त केल्या आहेत.
अधिक माहिती अशी कि, सागर प्रकाश मोरे व वैभव संजय वराट हे सरस्वती विदयालय समोर, जुना धानोरा रोड, बीड येथे विनापरवाना बेकायदेशिर रित्या स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगत उभे आहेत. अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत त्यावरुन सदर ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी वरील दोन इसम मिळुन आले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव त्यांचे 1) सागर प्रकाश मोरे (वय-२२) रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड 2) वैभव संजय वराट (वय-२१) वर्ष रा. स्वराज्य नगर, बीड असे सांगितले त्यांचे अंगझडती मध्ये दोघाकडे प्रत्येकी एक-एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल ) व 05 जिवंत काडतुस मिळुन आले. त्यानंतर आरोपींतांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस सदरचे गावठी पिस्टल कोठुन व कोणाकडुन आणले आहे. त्यावर त्यांना सदरच्या गावठी पिस्टल आम्ही सुयोग ऊर्फ छोटया मच्छिद्र प्रधान रा. स्वराज्य नगर, बीड ह.मु. जिजामाता चौक, बीड यांच्याकडुन घेतले आहेत व त्याने व आम्ही एक गावठी पिस्टल शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यास विक्री केलेले आहे व तो सध्या पोलीस पेट्रोलपंप समोर बालेपीर येथे उभा आहे. असे सांगितल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी जाऊन शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख (वय-२१) रा.आजमेर नगर, बालेपीर, बीड यास ताब्यात घेवून त्याचे अंगझडती मध्ये एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल ) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. यांचेविरुद्ध फिर्यादी नामे श्रीराम खटावकर पोलीस उप-निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संतोष साबळे पोलीस निरिक्षक स्थागुशा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, पोना- विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि- सचिन आंधळे, नारायण कोरडे, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.