Advertisement

भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी

प्रजापत्र | Tuesday, 08/08/2023
बातमी शेअर करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी टेस्ला कंपनीची महत्त्वाची जबाबदारी भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती दिली आहे. एलॉन मस्क यांनी कार निर्माती कंपनी टेस्लाच्या CFO म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी पदी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दिल्ली विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीचं टेस्लाचे भारतात पहिलं ऑफिस पुण्यात सुरु केलं आहे. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला CFO पदाची जबाबदारी देणं हे भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने एलॉन मस्क यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

 

भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी
भारतात प्रवेश केल्यानंतर अमेरिकन वाहन निर्माता कंपनी टेस्लाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केल्याचं जाहीर केलं आहे. टेस्लाचे सीएफओ झाचेरी किरखॉर्न यांनी चार वर्षांनंतर CFO पदावरून पायउतार झाले आहेत. आता त्याची जागा भारतीय वंशाचा वैभव तनेजा घेणार आहेत. वैभव तनेजा हे सध्या टेस्ला येथे मुख्य लेखा अधिकारी आहेत. त्यांच्यावर आता CFO पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement