Advertisement

मनसेच्या वतीने बीड नगर पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्याच्या खड्यामध्ये झाडे लावून आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 08/08/2023
बातमी शेअर करा

 

बीड - मनसे संस्थापक राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष आशोक तावरे यांच्या सुचनेवरून मनसे शहर अध्यक्ष करण लोंढे याच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील आमरधाम स्मशानभुमी ते जालना रोडला जोडणारा व मोंढा बाजार पेठेला जोडणारा प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात आले.

 

शहरातील श्रीसंत सावता माळी चौक, सहोयागनगर, कृष्णा मंदिर रोड, फुलाई नगर, जिजामाता चौक, सुभाष रोडला जोडणारा प्रमुख रस्ता असून आवजड वाहाणे व माहिला व शाळकरी मुलांची व शहरातील नागरिकांची सतत वरदळ असते. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असून नवा पुल ते जालना रोड लगतचा हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. महिला व शाळकरी मुलं व नागरिकांचे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. त्या संदर्भात नगर पालीकेस वेळो-वेळी लेखी तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे जिजामाता चौक, मोंढा रोड, या ठिकाणच्या मनसे शहराध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली खड्यांमध्ये (प्रतिकात्मक) झाडे लाऊन अंदोलन करण्यात आले. यावेळी नगर पालिका प्रशासनाला हात जोडूनची भाषा कळत नसेल तर हात सोडूनची भाषा शिकवण्यात येईल. तरी येत्या दोन दिवसात या रस्त्याचे काम त्वरीत सुरु न केल्यास मनसे स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे, शहराध्यक्ष करण लोंढे, शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर, शहर उपाध्यक्ष ऋषिकेश सोळंके, शहर चिटणीस कार्तिक जव्हेरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सुर्या तावरे, सुरेखाताई मुजमुले व असंख्य महिला भगिनी तसेच मनसैनिकांची मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement