Advertisement

उपळी शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

प्रजापत्र | Tuesday, 08/08/2023
बातमी शेअर करा

 

वडवणी - तालुक्यातील उपळी शिवारातील कुंडलिका नदी पात्रात आज सकाळी अनोळखी महिलेचे मृतदेह आढळला असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

 

वडवणी तालुक्यातील उपळी शिवारात कुंडलिका नदी पात्रात आज (दि.8) रोजी सकाळी अनोळखी महिलेचे मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून परिसरात दुर्गंधी सुटल्याने प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत चर्चा होत असल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे वडवणी पोलिस घटनास्थळी रवाना झाल्याचे कळते. अद्याप सदर घटनेची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Advertisement

Advertisement