काँग्रेसच्या गोट्यातून दुसरी आनंदाची बातमी आहे. राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे निलंबनही मागे घेण्यात आले आहे. सभागृहात व्हिडिओ बनवल्यामुळे हे निलंबन करण्यात आले होते. संसद कामकाजादरम्यान व्हिडीओ बनवून ट्विटरवर अपलोड कल्याने खासदार रजनी पाटील यांचे निलंबन करण्याच आले होते. राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली होती.संसदेचे चाली कामकाज असताना ही कारवाई झाल्याने विरोधकांवना संताप व्यक्त केला. रजनी पाटील या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विश्वासू खासदार म्हणून ओळखल्या जातात.
बातमी शेअर करा