Advertisement

दीड वर्षात एका घरालाच चोरट्यांकडून दोनदा लक्ष

प्रजापत्र | Sunday, 06/08/2023
बातमी शेअर करा

तांदळा-येथील ज्ञानेश्वर अंकुशराव गवते उर्फ राजेंद्र यांच्या घरी शुक्रवारी (दि.४) मध्यरात्री चोरटयांनी गेटचे कुलुप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या,चांदीच्या दागिन्यासह व काही रोख रक्कम असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला.विशेष म्हणजे मागच्या दीड वर्षात चोरटयांनी गवते यांच्या घराला दोनदा लक्ष केल्यामुळे खळबळ उडाली आहे.याप्रकरणी  चकलंबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 


       

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गालगत तांदळा येथे ४ ऑगस्ट रोजी राजेंद्र अंकुश गवते आपल्या राहत्या घरी झोपलेले असताना रात्री एकच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी आई सागरबाई यांना कस लातरी आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या व समोर अज्ञात चोरट्यांना पाहून मुलाला आवाज दिला.राजेंद्र यांना आईचा आवाज येत असल्याने तेही जागे झाले.त्याच क्षणी चोरट्यांनी राजेंद्रच्या गळ्याला चाकू लावला आरडाओरडा केला तर जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच घरातील दोन कपाटाची झाडाझडती घेतली. परंतु कपाटात काही मिळाले नाही.त्यामुळे शेवटी राजेंद्रने चोरट्यांनी सांगितले की मागील वर्षी आमचे घर फुटले होते त्यावेळेस सर्व सोने व पैसे चोर घेऊन गेले होते आता माझ्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. यावर चोरट्यांनी आईच्या गळ्यातील पोत व पत्नीच्या गळ्यातील पोत चोरट्याने हिसकावून घेतली व खिशातील काही रोख रक्कम घेऊन पसार झाले.दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे ,पोलीस हवालदार मिसाळ हे करीत आहेत.

 

दीड वर्षात दोनदा लूट...  
विशेष म्हणजे तांदळा येथील राजेंद्र गवते यांच्या घरी १७ जानेवारी २०२२ रोजी दिवसाढवळ्या अज्ञात दरोडेखोरांनी दुपारी तीन वाजता घराचा कोंडा कुलपा सह तोडून घरातील १५ तोळे सोन्यासह ३८ हजारांवर दरोडेखोरानी हातसाफ  केला होता. वारंवार येथे चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून चकलांबा पोलिसांना दरोडेखोरांनी तगडे आव्हान दिले आहे. 

 

Advertisement

Advertisement