Advertisement

पेट्रोल-डिझेल भरा आणि जिंका कार, बाईक्स- इंडियन ऑईल ची ऑफर

प्रजापत्र | Wednesday, 16/12/2020
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : इंडियन ऑईलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत कोणत्याही इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर भरून भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. इंडियन ऑईलच्या या ऑफरचं नाव 'भरो फ्यूल जीतो कार' असं आहे. या ऑफरमध्ये केवळ 400 रुपये पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागेल. या ऑफरमध्ये सहभागी होऊन एसयूव्ही कारपासून बाईकपर्यंत बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. इंडियन ऑईलनुसार, ही ऑफर 4 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली असून 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत वैध असणार आहे.

या ऑफरमध्ये कसा भाग घ्याल -
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी 400 रुपये पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागेल. त्यानंतर एक सिंगल प्रिंटेड बिल मिळेल. त्यावर बिल नंबर आणि डीलर कोड असेल. SMS द्वारे डीलर कोड <space>बिल नंबर<space बिल रक्कम लिहून 90521 55555 वर पाठवावा लागेल.

एका दिवसांत एकच एसएमएस पाठवता येणार -
इंडियन ऑईलनुसार, एका दिवसांत एका आउटलेटचं एकच बिल आणि डीलर नंबर एसएमएसद्वारे वापरता येणार आहे. पण एका दिवसांत दोन वेळा या ऑफरमध्ये भाग घ्यायचा असल्यास, दुसऱ्या आउटलेटमधून पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागेल.

इंडियन ऑईलच्या या खास ऑफरमध्ये जे लोक भाग घेतील, त्यातील विजेत्याची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाईल. या ऑफरअंतर्गत जिंकणाऱ्या व्यक्तीला खालील वस्तू मिळू शकतील -
- एक एसयूव्ही (मेगा लकी ड्रॉ)
- चार कार (मेगा लकी ड्रॉ)
- 16 बाईक्स (मेगा लकी ड्रॉ)
- प्रत्येक आठवड्याला 25 विजेत्यांना 5 हजारचं मोफत फ्यूल
- दररोज 100 एक्स एक्स्ट्रा रिवार्ड्स मेंबर्स (ज्यांनी एक्स्ट्रारिवार्ड्स प्रोग्राममध्येही भाग घेतला आहे) विजेत्यांना 100 रुपयांचं मोफत फ्यूल.

         इंडियन ऑईलने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर या ऑफरमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीचं बिल कोणत्याही प्रकारे हरवल्यास किंवा ई-रिसीट डिलीट झाल्यास, त्याचं नाव या ऑफरमधून रद्द केलं जाईल. त्यामुळे ओरिजनल प्रिंटेड बिल सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तसंच ओरिजनल बिलाच्या कॉपीवरील शाई फिकट झाल्यास किंवा शाई निघून जाण्यापूर्वी बिलाची झेरॉक्स करून ठेवण्याचा सल्लाही इंडियन ऑईलकडून देण्यात आला आहे. तसंच या ऑफर अंतर्गत विजेत्यांची यादी इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिली जाणार आहे. या ऑफरबाबत अधिक माहितीसाठी इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Advertisement

Advertisement