नवी दिल्ली : मणिपूरच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार भडकला. हिंसक गर्दीने १५ घरं जाळली. शिवाय गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी लँगोल गावात गर्दी झाली. या गर्दीने सुमारे १५ जणांची घरं जाळली. सुरक्षा दलाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्रृधुराचा वापर केला.
युवकावर गोळीबार
या हिंसाचारात एका ४५ वर्षीय युवकावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या डाव्या पायावर गोळी लागली. जखमी युवकाला क्षेत्रीय आयुर्वेदिक संस्थानमध्ये भरती करण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. युवकाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. परंतु, सुरक्षा दलाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
व्यापाऱ्याचे दुकान जाळले
इंफालच्या पूर्व भागातील जिल्ह्यांतही हिंसाचार झाला. चेकोन भागात शनिवारी एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दुकानाला आग लावण्यात आली. त्यात व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय जवळच्या तीन घरांना आग लागली. अग्नीशमन विभागाने आग नियंत्रणात आणली.
आतापर्यंत १६० जणांचा बळी
काँगपोकपी जिल्ह्यात सुरक्षादल आणि आंदोलकांमध्ये गोळीबार झाला. ही घटना न्यू किथेल्मनबी पोलीस ठाण्यातील के. ए. मुंगचमकोम भागात घडली. सुरक्षा दलाने आंदोलकांना अटक केली. त्यांच्याजवळील ५० राऊंडवाली एसएलआर जप्त केली.
जनजीवन विस्कळीत
२७ विधानसभा क्षेत्राच्या समन्वय समितीच्या वतीनं गेल्या २४ तासांत हिंसाचार झाला. यामुळे मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात जातीय हिंसाचार ३ मे रोजी सुरू झाला. गेल्या तीन महिन्यांमध्ये १६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत ११९५ शस्त्र जप्त करण्यात आले.
सुरक्षा दलाचा अश्रृधुराचा वापर
तीन दिवसांपूर्वी चुराचांदपूर येथे ३५ जणांचे मृतदेह सामूहिक दफन करत असताना हिंसाचार भडकला होता. चुराचांदपूर आणि विष्णूपूर सीमेवर सुरक्षा दल आणि गर्दीमध्ये हिंसा भडकली. गर्दीकडून दगडफेक करण्यात आली. सुरक्षा दलाने अश्रृधुराचा वापर केला.