Advertisement

मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा जेरबंद

प्रजापत्र | Sunday, 06/08/2023
बातमी शेअर करा

बीड-स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या घटनांवर 'कंट्रोल' ठेवण्यास सुरुवात केली असून वडवणीमधील एक मोबाईल शॉपी फोडून अनेक साहित्य लंपास केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती.या घटनेत गुन्हा दाखल केल्यानंतर काल याप्रकरणातील आरोपीला वडवणीच्या रमाईनगर भागातून जेरबंद केले.यावेळी चोरीला गेलेला माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला असून ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे,नसीर शेख,श्री.दुबाले,श्री.शिंदे,भागवत शेलार,श्री.सुरवसे,श्री.मराडे यांच्या वतीने करण्यात आली. 

 


     

       बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी मागच्या महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.घरफोड्या,दुचाकी चोरांची टोळी,मोबाईल चोर जेरबंद केल्यानंतर आता काल रात्री वडवणी शहरातील मोर्या मोबाईल शॉपीच्या चोरट्याला पकडण्यात आले. रोहित संजय डोंगरे (वय-१९,रा.रामाईनगर,ता.वडवणी) असे त्या आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोर्या मोबाईलच्या चोरी प्रकरणात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राहत्या घरातून रोहित डोंगरेला ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांनी घरातून ब्लॅक झोन कंपनीचे चार मोबाईल,गोली कंपनीचा एक मोबाईल,फायर बोल्ड कंपनीच्या २ घडयाळ,केडीएम कंपनीचे २ एयर बर्ड,लिनोव्हा कंपनीचा टॅब,सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल आणि १ ओपो कंपनीचा मोबाईल ताब्यात घेतला.दरम्यान ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 

Advertisement

Advertisement