नवी दिल्ली - पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील बाजौरमध्ये रविवारी एका राजकीय सभेदरम्यान स्फोट झाला. पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनलनुसार 35 लोकांचामृत्यु झाला असून 80 लोक जखमी झाले आहेत. घटना बाजौरच्या खार तहसीलची आहे. सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या जमियत उलेमा इस्लाम फजल (JUI-F) ची रॅली येथे सुरू होती.
पक्षाने सांगितले - 35 कार्यकर्ते मारले गेले
JUI-F चे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते, मात्र काही कारणास्तव ते येथे पोहोचू शकले नाहीत. नंतर मीडियाशी संवाद साधताना हाफिज म्हणाले - या स्फोटात आमचे सुमारे 35 कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो. अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल खचणार नाही.हाफिज पुढे म्हणाले - असे हल्ले यापूर्वीही होत आले आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षाही दिली जात नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू.