Advertisement

पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली

प्रजापत्र | Thursday, 27/07/2023
बातमी शेअर करा

माजलगांव - पुरुषोत्तमपुरीचा रस्ता हा भाविकांसाठी काळ ठरु लागला आहे. चारच दिवसांपूर्वी भाविकांची वाहतूक करणारा ऑटोरिक्षा उलटल्याची घटना ताजी असताना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हूल देण्याच्या प्रयत्नात दोन रिक्षांचा अपघात झाला. यात दोन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथून बालाजीनगर भागात राहणाऱ्या सुमारे ५० महिला भाविक खाजगी ट्रॅव्हल्सने पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी आल्या होत्या. पुरुषोत्तमपुरी फाटयापासुन ते गावापर्यंतचा सुमारे ३ कि.मी. ऑटोरिक्षांनी जावे लागते. सुरुवातीला ट्रस्टच्यावतीने खाजगी बस लावून गावापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी असलेल्या तसेच आजुबाजुच्या गावांतील अॅटोरिक्षावाल्यांनी मुजोरी करीत ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेली व्यवस्था बंद पाडली. 

 

Advertisement

Advertisement