Advertisement

धारूरच्या घाटात पुन्हा विचित्र अपघात

प्रजापत्र | Sunday, 23/07/2023
बातमी शेअर करा

सय्यद शाकेर 
किल्लेधारुर-धारुर घाटात रविवारी (दि.२३) पावणे नऊ ते नऊच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून जवळजवळ सहा वाहने एक दुसऱ्यावर आदळली आहेत.
        अवघड वळणामुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात रविवारी सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर अधिच अपघातग्रस्त असलेल्या कंटेनरजवळ हा अपघात झाला. प्रथमदर्शनी सदर अपघातात दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याने दुचाकी (क्र. एमएच २३ जे ९३१० ) समोर असलेल्या क्रुझरला (क्र. एमएच १३ जे.ई. १४१७) मागून धडकल्याचे दिसत आहे. अपघातात सहा वाहने क्षतिग्रस्त झाली असून एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातस्थळी अद्याप मदत पोहोचली नसून जखमीचे नाव महेश लाखे असे असल्याचे कळते. महेश लाखे हे पाणी फाऊंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर धारुर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी  स्वा.रा.ति. अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे.

 

व्हिडिओ बघण्यासाठी खाली क्लिक करा 
 

https://youtube.com/shorts/UBKvQ9NCa7A?feature=share

Advertisement

Advertisement