Advertisement

पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी जाताना रिक्षा उलटली

प्रजापत्र | Thursday, 20/07/2023
बातमी शेअर करा

माजलगांव (प्रतिनिधी) - पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा आज सकाळी अकरा वाजता पुरुषोत्तमपुरी फाटा येथे उलटली. यात दहा महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व भाविक पैठण येथील असल्याची माहिती आहे.

 

सध्या अधिक मासचा महिना सुरू झाला असून भारतात पुरुषोत्तमचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी महिनाभर भावीक मोठ्या प्रमाणावर येत असतात. अधिक मास सुरू होऊन तीन दिवस उलटले असून भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहेत. यामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप व रिक्षा मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. याकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तमपुरी फाट्याजवळ भाविकांना घेऊन जाणारा रिक्षा उलटला. रिक्षामध्ये जवळपास १५ महिला प्रवासी होत्या. यातील दहा महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व भाविक पैठण येथील असून त्यांना तात्काळ विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement

Advertisement