बीड - महाराष्ट्रात लाखो डी.एड.बी.एड धारक बेरोजगार असतांना शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय डी.एड.बी.एड धारकांवर घोर अन्याय करणारा आहे त्यामुळे तो मागे घ्यावा, यासाठी आज (दि.१७) रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी 7 जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो डी.एड.बी.एड. धारकांवर अन्याय होत आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेून डी.एड. बी.एड. धारकांची भरती करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेख युनुस, बलभीम उबाळे, शेख मुश्ताक, शेख मुबीन, संजय पालवे, अशोक येडे, धनंजय सानप, कालीदास वनवे, अशोक सानप, दीपक बांगर याचंयासह आदींची उपस्थिती होती.