Advertisement

टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार!

प्रजापत्र | Monday, 17/07/2023
बातमी शेअर करा

भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो सप्टेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यानंतर पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला होता. क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची क्रिकेट चाहते (fans) आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता जसप्रीत बुमराहच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

जसप्रीत बुमराहचं कमबॅक होणार..

जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला असून तो आता कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० (T-20) मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची ब तुकडी पाठवली जाऊ शकते. सध्या जसप्रीत बुमराह नॅशनल (national) क्रिकेट अॅकेडमीत सराव करतोय.

Advertisement

Advertisement