Advertisement

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यात उत्तर द्या

प्रजापत्र | Friday, 14/07/2023
बातमी शेअर करा

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज ( १४ जुलै ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दोन आठवड्यांत आपले उत्तर सादर करावे, अशी नोटिस सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना बजावली आहे.

 

Advertisement

Advertisement