Advertisement

'मला तडजोड करावी लागली तर...'

प्रजापत्र | Thursday, 13/07/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील बदललेल्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचेही सूतोवाच केले आहेत.

राज ठाकरे आज (ता. १३ जुलै) रत्नागिरीतील चिपळून येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, '' आपला विचार आपण लोकांपर्यंत का पोहचवायचे म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी बोलताना पदानुसार न बोलता मनाने बोलणे गरजेचे आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचे उद्घाटन झाले आहे. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली आहे. जोरदार कामाला सुरुवात झाली.

एखाद्या पदावर बसल्यानंतर काम झाले पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावे, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, पण तडजोड करणार नाही. राज्यात जो काही व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही, असे महत्त्वाचे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

लोकसभेची निवडणूक का लढवायची असा सवालही यावेळी पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केला. सद्यपरिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, मी पुढील १५ दिवसात मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितेल.

Advertisement

Advertisement