राज्यात तीन पक्षांचे ट्रिपल इंजीन सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे अंतर्गत वाद निर्माण होऊ नयेत म्हणून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहेत.
समन्वय समितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रत्येकी ४ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीत एकूण १२ सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार यांचा समितीत समावेश आहे.
शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे यांची समितीत निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे नेते समन्वय समितीत आहेत.
बातमी शेअर करा