गेवराई -शहरातील पाढंरवाडी रोडवर मोठा धान्य साठा जप्त केल्यानंतर या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीड पोलीस करत आहेत.मात्र या घटनेने एकच खळबळ उडाल्यानंतर तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांसह ४० जणांचे पथक आता गेवराई तालुक्यातील रेशन दुकानाची तपासणी करणार आहे.या संदर्भात गेवराईचे तहसिलदार धोंडिबा गायकवाड यांनी माहिती दिली.
तालुक्यात मोठा प्रमाणात राशन घोटाळा होत आहे यांची फक्त चर्चाच होत होती,परंतु भाजप नगरसेवक पती अरूण मस्के यांच्या खाजगी गोदामात पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर धान्य साठा जप्त करण्यात बीड पोलीसांना यश आले.याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे तपासाचे चक्रे गतीने फिरत असून महसुलमधील अधिकारी देखील काही कर्मचारी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.कोणत्या राशन दुकानदारांनी अरूण मस्के याला राशन पुरवले तसेच हे राशन आले कुठून असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.सगळे तर्क-वितर्क तपासात समोर येणार असून गेवराई महसुलने देखील हा विषय गांभीर्याने घेतला आहे.येत्या चार दिवसांत तलाठी मंडळ अधिकारी हे गेवराई तालुक्यातील सर्व राशन दूकान यांची तपासणी करण्याचे आदेश गेवराई तहसिलदार यांनी काढले आहेत.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment