बीड - शेतकर्यांना अनुदान अद्यापही मिळाले नसून राज्य सरकारची ही दिरंगाई पहाता शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या खरीप पेरणीचे दिवस असून पेरणीला शेतकर्यांना पैसे लागतात. शेतकर्यांना पेरणीसाठी पैसे कामी यावे यासाठी तत्काळ त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत, यासह इतर मागण्यांसाठी आज (दि.१२) रोजी शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये शेतकर्यांसह शेतकरी पुत्रांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेतकर्यांचे अनुदान रखडले आहेत, ते अद्यापही मिळालेले नाहीत. पीक विम्याचे पैसेही सर्व शेतकर्यांना मिळाले नसून याबाबत शासन दोषी आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना पैसे लागतात. बी-बियाणांसाठी शेतकर्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे वर्ग करावे, या मागणीसाठी आज धनंजय गुंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकर्यांसह शेतकरी पुत्रांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.