Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाला 500 दिवस पूर्ण

प्रजापत्र | Sunday, 09/07/2023
बातमी शेअर करा

24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला आज 500 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूवर संयुक्त राष्ट्रानी (UN) आक्षेप घेतला आहे. या 500 दिवसांत युक्रेनमधील 9 हजार सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे UN ने सांगितले आहे. यामध्ये 500 मुलांचा समावेश आहे. तर 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

 

त्याच वेळी, युद्धामुळे जुलै 2023 पर्यंत 60 लाख लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. यामध्ये सर्वाधिक 12,75315 लोक रशियाला गेले आहेत.  अहवालानुसार, या 500 दिवसांत युक्रेनच्या इमारती आणि पायाभूत सुविधांना 11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. युक्रेनला युद्धाच्या परिणामातून सावरण्यासाठी 10 वर्षे लागतील, त्यासाठी 33 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे म्हटले आहे.
 

Advertisement

Advertisement