◼️साहिल पटेल
बीड दि.७ - मागच्या काही वर्षात नशा करण्यासाठी स्टिकफास्टचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अल्पवयीन मुलांपासून अनेक तरुण या नशेच्या आहारी जात आहेत. या नशेच्या व्यसनात अनेक मुले अडकल्याने त्यांच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते, अशी बाब त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आली. मैदाने, गार्डन, मोकळ्या जागी ही मुले रात्री नशा करत असल्याचे दिसून येत आहे . (In the last few years, stickfast has become widely used for intoxication. Many youths are getting addicted to this drug from a young age. He was told by the doctor that many children are addicted to this drug and their mental and physical health is adversely affected and they are likely to get many diseases. It is seen that these children are intoxicated at night in fields, gardens and open spaces.)
देशात जवळपास अडीचशे प्रकारच्या अंमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गांजा, चरस, हेरॉइन, ब्राउन शुगर, एमडी, काही कफ सिरप, कोकेन, अफीम अशांचा समावेश आहे. मात्र, या व्यतिरिक्तही अनेक पदार्थ नशेकरिता वापरण्यात येतात. आयोडेक्स, ग्लू-स्टिक, नेलपेंट, व्हाइटनर आदींपासूनही नशा करता येते. या सर्व वस्तू घराघरांमध्ये उपलब्ध आहेत. शाळकरी व अल्पवयीन मुले अशा वस्तूंचा नशेकरिता वापर करीत असल्याचे प्रकार अनेक वेळा उघड झाले आहेत. पण, स्वस्तामध्ये मिळणाऱ्या नशेच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या नशेमध्ये अनेक गरीब, अल्पवयीन अडकत चालले आहेत. त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत.
अशी केली जाते नशा
स्टिकफास्ट हे रूमालावर घेऊन त्यांचा वास घेऊन ही मुले नशा करतात. त्यासाठी निर्मुष्य असलेली ठिकाणे ही त्यांचे अड्डे आहेत. तसेच, ब्रेडवर झंडूबाम लावून खाल्ले जाते. त्यामुळे सामाजिक संस्थांना सोबत घेऊन नशेतून बाहेर काढण्यासाठी पोलिस व इतर प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
म्हणून स्टिकफास्टच
‘स्टिकफास्ट’ किराणा दुकान, मेडिकल, हार्डवेअर, जनरल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होते, ‘स्टिकफास्ट’मध्ये असलेले घटक त्यावर लिहिलेले नाहीत.‘स्टिकफास्ट’ची किंमत कमी असल्यामुळे घेणे सहज शक्य होते , म्हणून देखील नशेडींची स्टीकफास्टला पसंती आहे.
शिक्षेने नाही तर प्रेमाने समजूत घालावीव्य
सनात अडकलेल्या मुलांचा शिक्षणातील रस समजून घेणे गरजेचे आहे. बहुधा अशी मुले कुटुंबाच्या प्रेमापासून पारखे झालेली असावीत, त्यांची भावनिक कुचंबणा होतेय का, हे तपासणे आवश्यक आहे. व्यसनात अडकलेल्या मुलांना शिक्षा करण्यापेक्षा प्रेमाने समजावून या प्रकाराच्या गांभीर्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे ठरेल.